किंचित दिलासा ; सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
हायलाइट्स:
- आज पेट्रोल-डिझेलचा भाव जैसे थेच ठेवल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला.
- सात दिवस झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११० रुपयांवर तर डिझेलने १०० रुपयांची पातळी गाठली होती.
- अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.२६ डॉलरने वधारला आणि ८३.६५ डॉलर प्रती बॅरल झाला.
आर्थिक अहवाल जाहीर; अर्थ मंत्रालय म्हणते लसीकरणाचे अर्थव्यवस्थेला झाले असे फायदे
कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावल्याने ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले आहे तर डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.०५ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.९६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०८.०४ रुपये आहे.
‘आकाशी’ झेप घे रे…! एका भेटीनंतर चक्र फिरली, झुनझुनवालांच्या विमान कंपनीला केंद्राचा ग्रीन सिग्नल
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०१.०० रुपये आहे. दिल्लीत डिझेल ९३.१८ रुपये आहे. चेन्नईत ९७.५६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.२४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.२५ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.२५ रुपये आहे.
सेन्सेक्स-निफ्टीचा रेकॉर्ड मात्र ‘टीसीएस’सह आयटी कंपन्यांचे शेअर गडगडले
अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.२६ डॉलरने वधारला आणि ८३.६५ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३७ डॉलरने वधारून ८०.५२ डॉलर झाला. नोव्हेंबर २०१४ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८३ डॉलरवर गेला आहे. सतत दुसऱ्या आठवड्यात यूएस क्रूड स्टॉक्सच्या वाढीनेही कच्च्या तेलाचा नफा मर्यादित ठेवला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्ट अनुसार, १ ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्त होणार्या आठवड्यात यूएस क्रूड इन्व्हेंटरीमध्ये सुमारे २.३ मिलियन बॅरलची वृद्धी झाली. तेलाचा कमी पुरवठा आणि नैसर्गिक गॅसच्या वाढत्या किंमती या ओढाताणीत आर्थिक क्रियाकलापातील सुधार पाहता इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे आगामी आठवड्यात किंमती वाढू शकतात.