सोने महागले ; आज कमॉडिटी बाजारात झाली मोठी वाढ , चांदीपण वधारली


हायलाइट्स:

  • मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७२२७ रुपये आहे.
  • सध्या एक किलो चांदीचा भाव ६१७९० रुपये आहे. त्यात ४६ रुपयांची वाढ झाली आहे.
  • सणासुदीचा हंगाम सुरु असून त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत.

मुंबई : कमॉडिटी बाजारातील सोने आणि चांदीमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने २४० रुपयांनी तर चांदीमध्ये ३०० रुपयांनी ११० रुपयांनी महागले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७२२७ रुपये आहे. त्यात १७६ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव ६१७९० रुपये आहे. त्यात ४६ रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ६१८६८ रुपयांपर्यंत वाढला होता.

बिटकॉइन वधारला, डोजेकॉइनमध्ये घसरण ; जाणून घ्या क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४६९५० रुपये आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५१० रुपये झाला आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत २४० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४३०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत ११० रुपयांची वाढ झाली आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०५० रुपये आहे.

खूशखबर ; दिवाळीपूर्वी मिळणार ‘पीएफ’वर व्याज, जाणून घ्या कशी कराल खात्री
याआधी सोमवारच्या सत्रात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६९१२ रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यात १२५ रुपयांची घसरण झाली होती. बाजार बंद होताना सोने ४७०३६ रुपयावर स्थिरावले. एक किलो चांदी ६१७६१ रुपयांवर बंद झाला. त्यात ४० रुपयांची घसरण झाली होती. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७०१३ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात १८६ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७३७० रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१७९७ रुपयांपर्यंत वाढला. त्यात ५३९ रुपयांची वाढ झाली होती.

किंचित दिलासा ; सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७७० डॉलरच्या आसपास आहे. चांदीचा भाव ०.२ टक्के घसरण झाली आणि चांदीचा भाव प्रती औंस २२.५५ डॉलर होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: