Video: धक्कादायक! घरांवर विमान कोसळले, दोन ठार


कॅलिफोर्निया: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एक लहान विमान निवासी भागात कोसळले. हे अपघातग्रस्त विमान थेट घरांवर कोसळले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे लहान विमान दोन इंजिन असणारे होते. विमान हवेत असताना त्यात अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे अचानकपणे हे विमान निवासी भागात कोसळले. विमान कोसळताच एक स्फोट झाला आणि भीषण आग लागली. या आगीची झळ काही घरांनादेखील बसली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि इतर प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

लैंगिक संबंधादरम्यान संमतीशिवाय निरोध काढण्यास बंदी ; चर्चेत आहे ‘हा’ कायदा

या विमान अपघातात पायलटसह दोघांचा मृत्यू झाला. तर, ३-४ जण गंभीर जखमी झाले. हा विमान अपघात एका शाळेजवळ झाला. हे लहान विमान घरावर कोसळल्यानंतर एका ट्रकवरदेखील आदळले. अपघातग्रस्त विमानाच्या स्फोटामुळे काही घरांना आग लागली.

‘या’ देशात महागाईचा आगडोंब; दूधाचा दर प्रतिलिटर ११०० रुपयांवर, गॅस सिलिंडर अडीच हजारांवर!
वृत्तसंस्थांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका लहान विमान अचानकपणे घरांवर कोसळले. विमानाच्या पायलटने नियंत्रण गमावले असल्याची शक्यताही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. विमान अपघातात किमान १० घरांचे नुकसान झाले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: