भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सामना कानपुर येथे खेळला गेला. आज या मालिकेचा शेवटचा दिवस होता. दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने वाहून गेला.
पहिल्या दिवशी 35 षटके खेळली गेली. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या. भारताने नऊ विकेट्सवर 285 धावा करून पहिला डाव घोषित केला.भारतीय संघाने 52 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर आटोपला आणि भारताला 15 धावांचे लक्ष्य मिळाले भारताने ते तीन गडी गमावून पूर्ण केले.
भारताने कानपूर कसोटीत बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. टीम इंडियासमोर 95धावांचे लक्ष्य होते, जे रोहित अँड कंपनीने तीन गडी गमावून पूर्ण केले. विराट कोहली 29 धावांवर नाबाद राहिला आणि ऋषभ पंत चार धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मा आठ धावा करून, शुभमन गिल सहा धावा करून आणि यशस्वी जैस्वाल 51 धावा करून बाद झाला.
विराट आणि यशस्वी यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने दोन, तर तैजुल इस्लामला एक विकेट मिळाली. यशस्वीने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला.
बांगलादेशने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 233 धावा केल्या
आज 1 ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखत पराभव केला आणि मालिका 2-0 ने जिंकली.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.