टी-२० वर्ल्डकप: भारतीय संघाची जर्सी प्रसिद्ध; फोटोमध्ये ‘या’ खेळाडूंना दिले स्थान


नवी दिल्ली: युएई आणि ओमान येथे पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाने जर्सी प्रसिद्ध केली आहे.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण

वाचा- भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी आली प्रसिद्ध जाहिरात;’मौका-मौका’चा प्रोमो रिलीज

बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, रविंद्र जडेजा आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना स्थान देण्यात आले आहे. वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध लढत होईल. पहिल्या दोन्ही लढती दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील. तिसरी लढत ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध अबुधाबी येथे होणार आहे. अखेरच्या दोन लढती या पात्रता फेरीतील विजेत्या संघांविरुद्ध ५ आणि ७ नोव्हेंबर रोजी दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमधील भारताची मॅच रद्द; जाणून घ्या वेळापत्रकातील नवे बदल

टी-२० वर्ल्डकपमधील भारताचे वेळापत्रक

>> भारत विरुद्ध पाकिस्तान- २४ ऑक्टोबर, संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध न्यूझीलंड, ३१ ऑक्टोबर ,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ३ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, अबुधाबी
>> भारत विरुद्ध बी १, ५ नोव्हेंबर,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध ए २, ८ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, शारजाह

वाचा- #Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू

मुख्य स्पर्धेतील लढतींच्या आधी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांविरुद्ध सराव लढती देखील खेळणार आहे. भारत पहिली लढत इंग्लंडविरुद्ध खेळणार होता. पण आता त्याच बदल झाला असून इंग्लंड ऐवजी भारत आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: