दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०७/१०/२०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं. मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला. मी जे बोलतो ते करतोच समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे. हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन राज्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले. ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणाली द्वारे करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय आवताडे, दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर , बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, विजयसिंह देशमुख अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडी चे सरपंच रामेश्वर मासाळ,सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे ,धनंजय पाटील, सुरेश भाकरे ,दीपक सुडके यांचेसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एक मत समाधानला दिल त्या समाधान आवताडेनी तुमच समाधान करून दाखविले आहे.ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्या आहेत. या मतदार संघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदार संघ नंबर एक वर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचा असून पाण्याने शेती, उद्योग या सर्व गोष्टी होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे .येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेतीपंपाचे वीज मोफत देण्याचे आम्ही नियोजन केले आहे. एक रुपयात विमा सुरू केला आहे .लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये या सरकारने दिले आहेत हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही रहा, या मतदारसंघाचे नंदनवन करून दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित यांना दिला .

प्रास्ताविकात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की,मी जे जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहे. वीज बिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48 हजार लोकांना याचा लाभ झाला आहे.म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र व राज्याकडून 13 हजार कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे . उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होत आहे. भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हा दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल. या अगोदरच्या काळात चाळीस गावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली मात्र निकृष्ट कामामुळे तीन वर्षापासून खर्च करूनही योजना व्यवस्थित चालत नाही. सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीलाही योजना चालवणे शक्य नाही. पुन्हा ती योजना एमजीबीकडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे. आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

या कार्यक्रम प्रसंगी विनोद लटके,अशोक चौंडे ,विकास पुजारी,प्राजक्ता बेणारे,प्रसाद कळसे,अनिल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ,माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे,जगन्नाथ रेवे,राजन पाटील, वृषाली पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व भारत मुढे यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदैवतांच्या पालख्या कार्यक्रम स्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करून कळस पूजन ही करण्यात आले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading