Jammu Kashmir :उमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होतील,फारुख अब्दुल्ला यांची घोषणा


abdullaha
जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आघाडी घेत विजयी झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री पदासाठी नियुक्त केले जाणार अशी घोषणा आज श्रीनगर येथे केली. 

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

 

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांतील पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस-एनसी युती जिंकणार हे स्पष्ट झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, 10 वर्षांनंतर जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. 

इथे पोलीस राजवट नाही तर लोकराज्य असेल. निरपराधांना तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न करू, राज्याला मीडिया मुक्त करून हिंदू -मुस्लिममध्ये आपसात विश्वास निर्माण करू. 

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “लोकांनी आपला जनादेश दिला आहे. त्यांनी हे सिद्ध केले आहे की 5 ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय (कलम 370 रद्द करणे) त्यांना मान्य नाही. 

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युती एकूण 90 जागांपैकी 52 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडनुसार, मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) फक्त दोन जागा मिळू शकतात. ओमर अब्दुल्ला हे यापूर्वी 2009 ते 2015 पर्यंत मुख्यमंत्री होते. 

Edited by – Priya Dixit 

 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading