जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद

जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- जबरदस्तीने वयोवृध्द इसमाकडील रोख रक्कम हिसकावुन घेवुन त्यास दमदाटी करणार्या आरोपींना सोलापूर ग्रामीणच्या पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत जेरबंद करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये, पंढरपूर विभागाचे सहा.पोलीस अधिक्षक डॉ. अर्जुन भोसले व पंढरपुर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुरनं – ६२०/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९(४),३५१(२), ३ (५) प्रमाणे दिनांक ०५/१०/२०२४ रोजी फिर्यादी गणू हाश्या जळे वय- ८० वर्ष, व्यवसाय- सुखवस्तु, रा.वाझे ता.पनवेल जि. रायगड हे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात आंघोळ करून महाव्दार चौक ते देवकते मळा दरम्यान रिक्षा नंबर ४९१० मधील चालक निलेश व अनोळखी इसम याने फिर्यादीचा गळा पकडून आवाज केलास तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी देवुन फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातील २०००/-रू जबरदस्तीने घेवुन त्यांना रिक्षातुन खाली उतरून निघुन गेले आहेत. म्हणुन त्या रिक्षा चालक निलेश व अज्ञात इसमा विरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल झाल्याने पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचार्यांचे दोन पथक तयार करून निलेश व अज्ञात इसमाचा व रिक्षाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पंढरपूर शहरामध्ये शोधत असलेली रिक्षा ही विस्तापितनगर येथे असल्याचे सांगून त्यामध्ये संशयित दोन इसम असल्याबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर सदर मिळालेल्या बातमीचे ठिकाणी गेलो असता सदर रिक्षा चालक हा त्याचे ताब्यातील रिक्षा घेवून निघुन जात असताना दिसले.त्यावेळी पोलीसांनी त्या व्यक्तीला रिक्षा थांबविण्यास सांगितले असता ते रिक्षातुन पळून जात असताना त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणल्यानंतर दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी पप्पु उर्फ निलेश हणुमंत भोसले वय -२५वर्ष रा. विस्थापितनगर पंढरपूर ता.पंढरपुर जि. सोलापूर याच्या शर्टाचे खिशामध्ये फिर्यादीचे गुन्ह्यातील रोख रक्कम २०००/-रू मिळून आली तर दुसरा आरोपी सुनिल बापु बंदपट्टे वय.३२ वर्ष, रा.विस्थापितनगर पंढरपूर ता. पंढरपूर जि.सोलापूर यांनी सदरचा गुन्हा करताना वापरलेली ४०,०००/-रू किंमतीची काळया पिवळया रंगाची रिक्षा तिचा आर टी ओ नंबर एम एच ०८ ई ४९१० असा मुद्देमाल मिळाल्याने तो गुन्ह्याचे कामी तपासात जप्त केली असुन त्यांना अटक केल्यानंतर त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे सुचनेप्रमाणे जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये,पंढरपुर विभागाचे सहा.पोलीस अधिक्षक डॉ.अर्जुन भोसले पंढरपुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, स.पो.फौ. नागनाथ कदम, रा.पो.फौ. राजेश गोसावी, रा.पो.फौ.शरद कदम, पो.हे.कों.बिपिनचंद्र ढेरे,पो.हे.का.सुरज हेंबाडे, पो.हे.कॉ. नवनाथ गाने,पो.हे.कों.नितीन पलुसकर, पो.हे.कॉ.सचिन हेंबाडे,पो.हे.का.सिरमा गोडसे, पो.कॉ.शहाजी मंडले,पो.कॉ. समाधान माने,पो.कों.निलेश कांबळे,पो.का. बजीरंग बिचुकले यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.का.सिरमा गोडसे करीत आहेत.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading