भाजपा व महायुती उमेदवार आमदार राम सातपुते यांचे सोलापूर शहर मध्य मतदार संघात कार्यकर्ते व नागरिकां कडून उत्स्फूर्त स्वागत

शहर मध्य मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला -भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,16/04/2024 – गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेने भाजपला मताधिक्य दिले आहे.शहर मध्य मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे,असे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापूर येथे बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघात दौरा केला.ठिकठिकाणी राम सातपुते यांचे कार्यकर्त्यांकडून तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

आमदार राम सातपुते यांनी रामलाल चौक, कोनापुरे चाळ, काडादी चाळ, रामवाडी सेटलमेंट,मोदी, हुडको ,सोनी नगर, महावीर चौक ,मुर्गी नाला, सात रस्ता, मल्लिकार्जुन नगर, पाथरूट चौक,घिसाडी गल्ली,तेलंगी पाछा पेठ आदी परिसरात भाजपासह महायुतीच्या पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading