महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार – नाना पटोलेंना विश्वास

महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार -नाना पटोलेंना विश्वास

भाजपने ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करू नये

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४ – सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे.जनतेने त्याला संपण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व ४८ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आला आहे. यातून जनतेला देशातील जे तानाशाह सरकार आहे त्याला जनतेने खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. भर उन्हात देखील प्रणिती शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं आले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

भाजपचा जो उमेदवार आहे.तो ऊसतोड कामगार राहिला नाही.आता तो किती श्रीमंत झाला आहे ते तपासावे.भाजपने आता ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करण्याचे काम करू नये, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला.यावेळी प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *