[ad_1]

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात, जुन्या वैमनस्यातून सहकारी चालकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी एका 35 वर्षीय 'ऑटोरिक्षा' चालकाला अटक केली. अशी माहिती पोलीस अधिकारींनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी भिवंडी परिसरात ऑटोरिक्षा चालक याचा मृतदेह त्याच्या तीनचाकीमध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. व तापास सुरु केला.
माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आणखी एका ऑटो चालकाला ताब्यात घेतले. मृत चालक आणि आरोपी चालकांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. तसेच भिवंडीच्या कोनगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितले की, आरोपी चालक सूड घेण्याच्या प्रयत्नात मृत चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.
तसेच गुरुवारी आरोपीने मृत चालकाच्या मानेवर चाकूने वार केले होते. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link

