आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी

विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार

अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन करताना गावागावांत होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व ही देशाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीजींच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत गावकऱ्यांनी भाजपाला साथ देण्याचा संकल्प केला.

सोलापूर मतदारसंघ माझा परिवार असून माझ्या परिवारासाठी मी सदैव उपलब्ध असणार आहे.आज आपल्या सोलापूर मतदारसंघात तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी कंपन्यांना सोलापुरात घेऊन येण्यासाठी माझी प्रमुख भूमिका असणार आहे.गावागावांत रस्त्यांचा विस्तार आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राची मदत घेऊन काम करेन असे आश्वासन आमदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी दिले. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील विकसित भारत साकारण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा साथ द्यावी आणि मोठ्या मताधिक्याने मोदी सरकारला निवडून द्यावे असा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, अप्पू बिराजदार, महेश हिंडोळे, श्रीशैल ठोबरे, शहाणप्पा मंगाणे, बसवराज शेळके, बसवराज पाटील, मुल्ला गुरुजी, सिध्देश्वर मठपती, राजकुमार कीवडे, सतीश कणमुसे, सौ. वनिता सुरवसे, प्रदीप जगताप, श्याम स्वामी,लक्ष्मीबाई पोमाजी,सुनिल सावंत,संतोष पोमाजी,प्रदीप पाटील, प्रकाश पोमाजी,बाळासाहेब भोसले,शिवानंद पटणे, रवी राठोड, मल्लिकार्जुन शिदोरे,मल्लिकार्जुन उनादे,वैजिनाथ वर्दे, कमलाकर सोनकांबळे, मल्लिकार्जुन धोंडपा, यामाजी मौला, पठाण इराय्या स्वामी, जयश्रीताई बटगेरी, दयानंद बिडवे, लखन झंपले तसेच ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *