पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- आषाढी यात्रा कालावधीमध्ये व इतर यात्रा कालावधीमध्ये वाखरीमधून अनेक मानाच्या व इतर पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत असतात.अस्तित्वात असणारा रोड हा लहान असल्याने वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पालखी मार्गाचा रस्ता मोठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीही शासनाने उपलब्ध करून दिला आला आहे. सध्या सदरचे पालखी मार्ग रस्त्याचे काम सुरू झाले असून आषाढी यात्रा पूर्वी सदरचे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे परंतु वाखरी विसावा ते मलपे ओढ्यापर्यंत दुतर्फा मोठ्या प्रमाणात टपरीधारकांनी अतिक्रमण केलेले होते. वारंवार संबंधित टपरीधारक यांना पालखी मार्गाचे काम चालू झाले असल्याने आपण टपऱ्या काढून घ्यावेत जेणेकरून अतिक्रमण काढताना टपरी धारकांचं कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून सूचना दिल्या होत्या वारंवार सांगूनसुद्धा टपरीधारक अतिक्रमण काढण्यास तयार नव्हते म्हणून आज महामार्गचे अधिकारी व नगरपरिषदेची टीम अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता काही टपरीधारक व नगरपरिषद नगर अभियंता व इतर कर्मचाऱ्यांबरोबर वादावाद झाला होता.

टपरीधारक रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यास तयार नसल्याने शेवटी पोलीस बंदोबस्तामध्ये 30 ते 35 अतिक्रमण केलेल्या टपऱ्या काढण्यात आल्या.

सदरची अतिक्रमणाची धडक मोहीम नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी अँड सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार,नगर रचनाकार सोमेश धट,सुहास झिंगे, उपनगर अभियंता प्रवीण बैले,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, महामार्गाचे अधिकारी राऊत,अग्निशमन अधिकारी संभाजी कारले, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे,रोड लाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर,बांधकाम लिपिक चिदानंद सर्वगोड,चेतन चव्हाण, मुकादम नवनाथ पवार,शाम अन्नदाते व नगरपरिषदेचे 30 कर्मचाऱ्यांच्या टीमने राबवली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रकाश भुजबळ व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading