अबब! रेस्टॉरंटमधील जेवणाचे बिल तब्बल ३८ लाख रुपये


लंडन: सोशल मीडियावर ‘Salt Bae’ नावाने प्रसिद्ध असणारे तुर्कीचे शेफ नुसरत गोक्श यांनी मागील महिन्यात लंडन येथील नाइट्सब्रिज पार्क टॉवरमध्ये आपल्या हॉटेलची १५ वी शाखा सुरू केली. रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर या हॉटेलची चर्चा आहे. मात्र, ही चर्चा जेवणाच्या आस्वादावरून नव्हे तर बिलावरून सुरू आहे. अनेकांनी या हॉटेलच्या बिलाचे फोटो शेअर करत रेस्टॉरंटला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने आपले ३८ लाखांच्या बिलाचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक बिल असल्याचे म्हटले जात आहे.

या बिलामध्ये सलाड, फ्राइससारख्या सामान्य खाद्यपदार्थांचे बिलही अव्वाच्या सव्वा आहेत. या महागड्या बिलामध्ये २२ खाद्यपदार्थांचा समावेश आहे. त्याच्या किंमती ३७ हजार २३.१० पौंडच्या (जवळपास ३८ लाखांच्या) घरात आहे. त्याशिवाय या बिलामध्ये ५०० पौंड हे सर्व्हिस चार्ज म्हणून घेण्यात आले आहेत. या बिलानुसार, ग्राहकाने वाइनसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. हे बिल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हटवण्यात आले.

महागाईने जनता त्रस्त; मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!
या बिलावरून अनेक युजर्सने विविध प्रतिक्रिया नोंदवल्यात. एका युजर्सने म्हटले की, एकीकडे ३० हजार पौंडचे रेस्टोरंट्स बिल आणि महाग दरांवर टीका करणे हे दुटप्पी वागण्यासारखे आहे. मागील महिन्यात रेस्टोरंट्स सुरू झाल्यानंतर अनेकांनी या रेस्टोरंटच्या महागडी बिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा एक ट्रेंड सुरू झाला असल्याचे म्हटले जात आहे. एका युजरने लंडनमधील या रेस्टोरंटमध्ये जाण्यापेक्षा तुर्कीमध्ये जाऊन सॉल्ट बेकच्या तेथील रेस्टोरंटमध्ये जाऊन खाणे अधिक परवडण्यासारखे आहे.
लैंगिक संबंधादरम्यान संमतीशिवाय निरोध काढण्यास बंदी ; चर्चेत आहे ‘हा’ कायदा

याआधीदेखील एका ग्राहकाने ट्विटरवर जेवणाचे बिल शेअर केले होते. त्यानंतर लोकांनी रेस्टॉरंटला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. एका ग्राहकाला १८०० पौंडचे बिल देण्यात आले. याआधी मियामीतील एका आउटलेटवरही लोकांनी महागड्या दराबाबत प्रश्न उपस्थित केले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: