Maharashtra Eid guidelines: ईदच्या मिरवणुकीला परवानगी मिळणार, पण…; मार्गदर्शक सूचना जारी


हायलाइट्स:

  • ईदच्या मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार.
  • राज्य सरकारने जारी केल्या गाइडलाइन्स.
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन.

अहमदनगर :ईद-ए-मिलाद मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार असून अटी व शर्तींचे पालन करून यादिवशी मिरवणूक काढण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. अर्थात यासंबंधीचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आला आहे. संबंधितांना स्थानिक पातळीवरून यासाठी परवानगी घ्यावी लागणार असून परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. ( Maharashtra Eid E Milad Guidelines )

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

निर्बंध शिथील झाल्यानंतर नवरात्र आणि दसऱ्याचा सण झाला. आता ईद येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती असल्याने या ईदच्या दिवशी मिरवणुका आणि धार्मिक प्रवचानांचे आयोजन केले जाते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मिरवणुकीला आणि मोठ्या उपक्रमांना परवानगी देण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र आतापर्यंत बरेच निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ईदसाठीही मागर्दशक सूचना जारी करून काही सवलती दिल्या असून काही निर्बंधही घालून देण्यात आले आहेत.

वाचा: तर राजकारणातून बाहेर पडलो असतो!; उद्धव ठाकरे फडणवीसांना काय म्हणाले?

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

– करोनाच्या पार्श्वभूमीवर शक्यतो गर्दी होणार नाही, अशा पद्धतीनेच कार्यक्रमांचे आयोजन करावे, ईद-ए-मिलाद शक्यतो घरात राहूनच साजरी करावी.
– मिरवणुका काढायच्याच झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत जास्त ५ ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त ५ व्यक्तींना परवानगी देता येऊ शकेल.
– मिरवणुकांदरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.
– मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करता येईल. ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील
– मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंडप बांधायचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. या मंडपात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
– मिरवणूक आणि कार्यक्रमांत नियमांचे काटेकोर पालन करून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येईल.
– रस्त्यावर पाणपोई उभारण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. त्या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे.
– प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.
– करोना परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

वाचा: ‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत, त्यामुळेच…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: