रविवारपासून रंगणार विश्वचषकाचा महासंग्राम, जाणून घ्या भारताचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता होणार…


नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम रविवारपासून सुरु होणार आहे. पण या विश्वचषकात भारतीय संघाचे सामने कोणत्या देशाबरोबर, कधी आणि किती वाजता होणार आहेत, याची सर्व माहिती खास महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी देत आहोत. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या सामन्यावर संपूर्ण विश्वाचे लक्ष असेल. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना हा इंग्लंडबरोबर १८ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे, हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. भारताचा दुसरा सराव सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २० ऑक्टोबरला रंगणार आहे.

विश्वचषकातील मुख्य फेरीत भारताचा पहिला सामना हा २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला दोन हात करावे लागणार आहे ते न्यूझीलंडबरोबर. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हा ३१ ऑक्टोबरला रंगणार आहे, हा सामना देखील संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यानंतर भारताला सामना करावा लागणार आहे तो रशिद खानच्या अफगाणिस्तानबरोबर. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ३ नोव्हेंबरला सामना होणार आहे, हा सामना देखील संध्याकाळी ७.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचे दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. पण हे दोन सामने कोणत्या देशाबरोबर होणार, हे अद्याप ठरलेले नाही. कारण विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजयी ठरलेले संघ हे मुख्य फेरीत दाखल होणार आहे. त्यामुळे काही दिवसांतच हे दोन संघ कोणते असतील, याबात माहिती मिळू शकेल. हे दोन्ही सामनेही संध्याकाळी ७.३० वाजताच सुरु होणार आहेत.

भारतीय संघ : विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: