महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.19/04/2024 – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मतदार संघातील कामती ता.मोहोळ, पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या सभा पार पडणार असून आमदार सर्वश्री सतेज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजीत कदम हे दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या तोफा धडणार आहेत. शनिवारी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ४ वाजता मोहोळ तालुक्यातील कामती येथे आमदार सर्वश्री सतेज पाटील, अमित देशमुख,विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महामाया मंदिर पटांगणात सायंकाळी ठीक ५:०० वाजता हे तिघेही नेते जाहीर सभेला संबोधित करतील.

मोहोळ पंढरपुर तालुक्यानंतर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची सोलापूर शहरात देखील जाहीर सभा पार पडणार आहे. शहरातील लिमयेवाडी येथे एसएलबी रिक्षा स्टॉप जवळील मैदानात सायंकाळी ६.३० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी,महाविकास आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि मतदारांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading