केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच विकसित भारताची हमी – आ.सुभाष देशमुख

निंबर्गीकरांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी तुमच्या सोबतचा दिला विश्वास

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज ता.१९/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी स्वागत करत सत्कार केला. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास दिला.

यावेळी माजी मंत्री व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत सोलापूर मतदार संघात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच विकसित भारताची हमी आहे, असे मत यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केले. सोलापूरच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मोदी सरकारला मोठ्या बहुमताने निवडून देण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांसोबत केला.

यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, हणमंत कुलकर्णी,अंबिका पाटील, डॉ.चनगोंडा हविनाळे, मळसिद्ध मुगळे, आप्पासाहेब पाटील, संदीप टेळे, आप्पासाहेब मोटे, अण्णाराव बाराचारे, यतीन शहा,शीतल गायकवाड, सरपंच केरके, महेंद्र उंबरजे, इरप्पा बिराजदार,भारत बिराजदार,प्रमोद बिराजदार,चनप्पा बोरगी, शशिकांत दुपारगुडे, सोमशेखर बिराजदार,अजय गुरव, प्रशांत करजगी, अक्षय गुरव यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *