gurmeet ram rahim : गुरमीत राम रहीमचा ‘डेरा’ तुरुंगातच; CBI कोर्टाने सुनावली जन्मपेठ, १९ वर्षांनी मिळाला न्याय


पंचकुलाः बाबा गुरमीत राम रहीम ( gurmeet ram rahim ) आणि इतर चार आरोपींना डेरा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंचकुलाच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने राम रहीमला ३१ लाखांचा दंडही ठोठावला आहे, तर उर्वरित आरोपींना ५०-५० हजारांचा दंड भरण्यास सांगितले आहे. हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता.

डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची २००२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. निनावी पत्र प्रसारित करण्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्याची हत्या करण्यात आली. डेरा मुख्यालयातील डेरा प्रमुख महिलांचे लैंगिक शोषण कसे करतात, हे या पत्रात सांगण्यात आले होते

अज्ञात पत्र प्रसारीत करण्यामागे रणजीत सिंह होता, असं डेरा प्रमुख राम रहीमला वाटत होते आणि त्याला मारण्याचा कट रचला गेला, असे सीबीआयचे म्हणणे आहे. गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी २०१७ मध्ये त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

UP Crime: दिवसाढवळ्या न्यायालय परिसरातच गोळ्या घालून वकिलाची हत्या

पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयचे हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात राम रहीमला शिक्षा झाली आहे. त्याच्याविरुद्ध आणखी एक खटला सुरू आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.

2 girls run over by vehicle : पोलीस अधिकाऱ्याने दोन तरुणींना चिरडलं, १ ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैदSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: