अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करतील – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करतील – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


यवतमाळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ /०४/ २०२४ – वाशीम क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करतील असा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विश्वास व्यक्त केला. खासदार भावना गवळी, हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशीम येथे मेळावा संपन्न झाला.शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्याला शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले मार्गदर्शन

यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्रामध्ये कृषी, सहकार, सिंचन, रेल्वे, रस्ते, आरोग्य यांच्यासंदर्भातील विकासात्मक कामे मोदी सरकारने पूर्ण केलेली आहेत.महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी देखील मोदी सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने केलेली आहे. पूर्वीपासूनच मतदार संघातील जनतेने कायमच भाजपा, शिवसेनेला मोठी साथ दिली आहे.आगामी काळातील मतदार संघाच्या विकासासाठी लोकसभेत महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटील महल्ले यांच्या प्रचारार्थ वाशीम येथे आयोजित शिवसैनिकांचा संवाद मेळाव्यास शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

याप्रसंगी खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, शिवसेना प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख प्रा.शिल्पा बोडखे,जिल्हा प्रमुख विजय खाजोडे, जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे,महिला आघाडी संघटक वैशाली येळणे, तालुका प्रमुख माणेरा दीपक दरसडे, तालुका प्रमुख मनीष गवले, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे, संपर्क प्रमुख वाशिम विधानसभा हुकूम तुटके, तालुका प्रमुख वाशिम प्रकाश महल्ले, शहर प्रमुख वाशिम शाम दुरतकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ.निलम गोऱ्हे यांनी राजश्री पाटील या अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवार असल्याने विकासाच्या नवनव्या योजना आणून त्या मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधू शकतात असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्वाधिक खासदार निश्चितपणे निवडून येतील अशी खात्री डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading