‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतो, पण हा विषय…’, नितीन गडकरी नेमकं कशाबद्दल बोलत होते?


‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतो, पण हा विषय…’, नितीन गडकरी नेमकं कशाबद्दल बोलत होते?

चिपळूण : कोकणात गेली ११ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामविरोधात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही दिवसापूर्वी आवाज उठवला आहे. आज याच विषयावर कोकणातील मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग ना. नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा करून, आंदोलने करून मनसेने या विषयावर प्रशासनाला जाब विचारला होता.

गडकरी यांच्या भेटीत त्यांनी सांगितले की, “त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय. पण माझ वैयक्तिक लक्ष आहे या रस्त्यावर. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार हा माझा शब्द आहे. हा आणि मी शब्द पाळतो. म्हणुनच कामाचा स्पिड वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय त्या दोन काँट्रॅक्टरना मी बदलतो. काळजी करू नका” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गडकरी यांनी चेहऱ्यावरच स्मितहास्य कायम ठेऊन मनसेच्या शिष्टमंडळाला ही ग्वाही दिली आहे अशी माहीती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली.

रामदास कदम यांना आणखी एक धक्का; आमदारकीची संधी पुन्हा नाही?
यावेळी आम्ही गेलो तेव्हा गडकरी यांना शुगर वाढल्याचा त्रास होत होता. त्यामुळे ते त्रासलेले होते पण राज ठाकरे यांनी पाठवलं आहे हे कळल्यावर त्यांनी आवर्जुन चौकशी केली. विषय समजुन घेऊन ” राज साहेबांना सांगा हा विषय मी लवकरच संपवतोय” असा निरोपही शिष्टमंडळाला दिला. यामुळे आता मनसे शिष्टमंडळाला थट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आश्वासन दिल्याने कोकणातील गेली कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाला लवकरच गती येईल अशी अपेक्षा कोकणातील जनतेला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी, पुण्यात निनावी पत्रामुळे राजकीय खळबळSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: