कुर्डुवाडीत परिचारिकांचा कोरोना योद्धा सन्मान

कुर्डुवाडीत परिचारिकांचा कोरोना योद्धा सन्मान
Corona warrior honors nurses in Kurduwadi
    कुर्डूवाडी / 12/05/2021 ,राहुल धोका - कुर्डूवाडी शहरातील ग्रामीण रुग्णालयात परिचारिक दिनानिमित्त परिचारिकांचा जीवनरक्षा समितीकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मान  करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र,मास्क , सँनिटायजर,गुलाब पुष्प देवून कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.सुनंदा रणदिवे यांना यशस्विनी सामाजिक अभियान माढा तालुका अध्यक्ष वर्षा कांबळे-मोरे यांनी सन्मानित केले. कोरोनाच्या या संकटकाळात परिचारिकेचे काम कठीण काम करत आहेत या वेळी शिवशाला सानप,संगीता भारती,सुनिता ग्राम,स्मिता पाँल , लिना गायकवाड ,मनीषा ढाकणे ,निशा लोंढे , शाहीन पठाण ,शिवगंगा पाखरे ,अर्चना अवताडे , संध्या जाधव आदीना सन्मानपत्र देवून पुरस्कृत करण्यात आले. 

याप्रसंगी अध्यक्ष राहुल धोका, डॉ.पंकज सातव, डॉ.प्रसन्न शहा, शाम पाटील ,दर्शन देवी ,अनिल सोनवर,संतोष दिक्षित,प्रसाद साळुंखे,राजू हलकुडे, विरेंद्र कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते .

रुग्णालयाच्या वतीने डॉ.सुनंदा रणदिवे यांनी जीवनरक्षा समितीचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: