पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत तांत्रिक माहीतीचे व गोपनीय माहीतीच्या आधारे वाहन चोरी करणारास केली अटक
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३/१०/२०२४ रोजी फिर्यादी किसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून फिर्याद दिली की, फिर्यादी हे त्यांचे कुटूंबासह नातेवाईकांच्या १०व्याचे विधी करीता त्यांची बोलेरो गाडी नंबर एम एच ४५ ए ८१११ ही दिनांक -२३/१०/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा ते सकाळी ८.०० वा दरम्यान पंढरपुर येथील दत्त घाट जवळील दत्त मंदीरासमोरील बोळात लॉक करून लावलेली ही कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमती विना चोरून नेली असल्याबाबत फिर्याद दिल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ६६२/२०२४ भान्यासं २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
लागलीच सदर ठिकाणी श्री. विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवून सदर घटनास्थळ पाहिले असता सदर ठिकाणच्या व आजू बाजूच्या सी.सी.टी.व्ही फुटेजचे अवलोकन केले असता सदर फुटेजमध्ये एक इसम सदर वाहनाजवळ संशयास्पद हालचाली करून सदरचे वाहन घेवुन जात असताना दिसला.
सदर फुटेजमधील संशयास्पद इसमाबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेवून त्याची ओळख पटवून तो ज्या दिशने गेला त्याचा माग काढत गोपनीय बातमीदारांमार्फत सदर संशयीत इसमाचा व बोलेरो जिपचा शोध घेतला असता ती सांगोला नाका पंढरपुर येथे सांगोला रोडवर मिळून आल्याने सदर इसमास व सदर वाहनास ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणले. त्याचेकडे सदर गुन्हयाचा तपास केला असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले.
नंतर सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लखन कृष्णात माने वय-३०वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा.वंदुर,ता. कागल, जि. कोल्हापुर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचेकडून गुन्ह्यात गेलेली बोलेरो जिप क्रमांक एम एच-४५ ए ८१११ ही सविस्तर पंचनाम्याने गुन्हयाचे कामी जप्त करून पुढील तपासकामी पोहेका / ३९६ सुरज हॅबाडे यांनी ताब्यात घेतली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले पंढरपूर विभाग, पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. आशिष कांबळे, स.पो.फौ.शरद कदम, स.पो.फौ.राजेंद्र गोसावी,पो.हे.कॉ. ३९६ सुरज हेंबाडे, पो.हे.कॉ.सचिन इंगळे, पो.हे.कॉ.सचिन हेंबाडे,पो.हे.कॉ.सिरमा गोडसे,पो.हे.कॉ. नितीन पलुसकर,पो.हे.कॉ. दादा माने, पो.हे.कॉ. विभुते, पो.हे.कॉ. प्रसाद औटी,पो.कॉ.समाधान माने,पो.कॉं.बजीरंग बिचुकले,पो.कॉ.कांबळे,पो.कॉ.शहाजी मंडले यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉं.सुरज हेंबाडे हे करीत आहेत.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.