Violence in Bangladesh: बांगलादेश ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ म्हणून घोषित करावं : विश्व हिंदू परिषदेची मागणी


हायलाइट्स:

  • बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्याची मागणी
  • बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्याची विहिंपची मागणी
  • शेख हसीना सरकारवर दबाव वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला विनंती

नवी दिल्ली : बांगलादेशात मंदिरं आणि हिंदूंच्या ७० घरांवर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलंय. यानंतर दिल्लीत आज विश्व हिंदू परिषदेकडून हजारो कार्यकर्ते बांगलादेश उच्चायोगासमोर आंदोलनासाठी दाखल झाले आहेत.

बांगलादेश आणि पाकिस्तानात हिंदूंविरोधात नरसंहार सुरू आहे. संयुक्त राष्ट्र संघ डोळे बंद करून बसलंय. ज्या पद्धतीनं हिंदुंचा नरसंहार होत आहे त्यातून बांगलादेश हिंदू-विरहीत देश बनवण्याकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलाय.

बांगलादेशाच्या निर्मितीपासूनच हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. बांगलादेशातील शेख हसीना सरकारकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिलं जातं, असा आरोपही विहिंपनं केलाय. बांगलादेश सरकारनं या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी उलट भारत सरकारलाच धमकी दिली. बांगलादेश संवैधानिकरित्या मुस्लीम देश आहे. असे जेवढेही देश आहेत त्यांचं सर्वांचं चरित्र एकसारखं आहे. इथून अल्पसंख्यांकांना हटवलं जातंय, असं म्हणत विहिंपनं बांगलादेश सरकारवर निशाणा साधलाय.

Uttar Pradesh: कुशीनगर विमानतळाचा शेतकऱ्यांनाही होणार फायदा, उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचं वक्तव्य
Karnataka: राहुल गांधी ‘ड्रग अॅडिक्ट’, ‘ड्रग पेडलर’; भाजप नेत्याची वादग्रस्त टिप्पणी

जर तुम्हाला विकासाकडे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला स्वत:च्या प्रतिमेत बदल करावा लागेल. बांगलादेशला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवावं लागेल आणि कट्टरतावाद्यांना वेळीच आळा घालावा लागेल, असा सल्लाही विहिंपनं बांगलादेशातील शेख हसीना सरकारला दिलाय.

शेख हसीना सरकारला हे जमत नसेल तर त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी करावी. १९७१ प्रमाणेच आम्ही मदत करू शकतो, असं म्हणत शेख हसीना सरकारला विहिंपनं चिथावणी दिलीय.

हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी, आम्ही नरेंद्र मोदी सरकारला विनंती करतो की बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा, असंही विहिंपनं म्हटलंय.

विकासाच्या वाटेवर असणाऱ्या काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून काही फुटीरतावाद्यांच्या मदतीनं दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. भारत सरकारनं पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावं, अशी मागणी करत भारत – पाकिस्तान मॅचवरही बंदी घालण्याची मागणी विहिंपनं केलीय.

Madhya Pradesh: पोलिसांवर जळते फटाके फेकले, जबलपूरमध्ये उपद्रवींचा धुमाकूळ
Taslima Nasreen: बांगलादेश ‘जिहादीस्तान’ बनलाय – तस्लिमा नसरिनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: