Vaccine Century: भारताकडे १०० कोटी लसींचं सुरक्षा कवच; पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा


हायलाइट्स:

  • भारतीय जनता पक्षाकडून लसीकरणाच्या टप्पा साजरा केला जातोय
  • खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सोहळ्यात सहभागी झालेत
  • भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे यश : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशानं आज एक महत्त्वाचा टप्पा पार करत भारतानं एक इतिहास रचलाय. भारतानं कोविड लसीकरणात १०० कोटी डोस देण्याचं काम पूर्ण करत एक नवा जागतिक रेकॉर्ड कायम केलाय. गुरुवारी हा टप्पा पूर्ण होताच लाऊड स्पीकर्सद्वारे विमान, जहाज, मेट्रो, रेल्वे, बस स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी याबद्दल उद्घोषणा करण्यात आली.

इतक्या जलद गतीनं लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरालय. हा क्षण केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या सोहळ्यात सहभागी झालेत.

दिल्लीत पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एम्स नवी दिल्लीच्या झज्जर परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेत (NCI) इन्फोसिस फाऊंडेशनच्या विश्राम सदनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना ‘आजचा दिवसाची इतिहासात नोंद झालीय. भारतानं लसीचे १०० कोटी डोस देण्याचा आकडा ओलांडला आहे. गेल्या १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी दोन हात करण्यासाठी आता देशाकडे १०० कोटी लसीच्या डोसचं मजबूत सुरक्षा कवच आहे. भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे यश आहे’, असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय.

भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड : कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार
Indian Pakistan: पाणबुडी रोखल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचं प्रत्यूत्तर…
आज आपण देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक मेडिकल कॉलेज बनवण्यावर भर देत असताना यात खासगी क्षेत्राची भूमिकाही महत्त्वाची आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.

लसीकरणाच्या १०० कोटींच्या टप्प्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळीच दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल झाले. इथे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. रुग्णालयात आज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोदींशिवाय अनेक केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.

‘भारतानं आज एक नवा इतिहास कायम केला आहे. आपण १३० कोटी भारतीय आज भारतीय विज्ञान, उद्योग आणि सामूहिक भावनेचा विजय पाहत आहोत. १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार करण्यासाठी भारताचं अभिनंदन. डॉक्टर, नर्सेस आणि हा टप्पा गाठण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार’ असं ट्विट यावेळी पंतप्रधानांनी केलंय.


गेल्या २४ तासांतील करोनाची आकडेवारी

भारतात गेल्या २४ तासांत १८ हजार ४५४ करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल १७ हजार ५६१ जणांनी करोनावर मात केलीय. या २४ तासांत १६० जणांच्या करोना मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ४१ लाख २७ हजार ४५०
  • उपचार सुरू : १ लाख ७८ हजार ८३१
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ३४ लाख ९५ हजार ८०८
  • एकूण मृत्यू : ४ लाख ५२ हजार ८११
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १०० कोटींचा टप्पा पूर्ण

Selfie With Priyanka Gandhi: प्रियांका गांधींसोबत सेल्फीनं वाढवल्या महिला पोलिसांच्या अडचणी
Arun Valmiki Death: प्रियांका गांधी रात्री उशिरा आग्र्यात पीडित कुटुंबाच्या भेटीलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: