कोरोना लसीचा आकडा एक अब्जाच्या पुढे; लसीने ‘या’ लोकांना बनवलं अब्जाधीश


नवी दिल्ली : भारताने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. देशातील कोरोना लसीकरणाची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत कोविड लसीचे १०० कोटी डोस भारतातील लोकांना देण्यात आले आहेत. भारताने सुमारे १० महिन्यांपूर्वी १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड लसीकरण सुरू केले आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजी २७९ दिवसांत हा विक्रम केला.

कोरोना व्हायरस लसीच्या उत्पादनामुळे जगभरातील नऊ लोकांना अब्जाधीश बनवले आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला देशातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

अनेक देशांमध्ये विकली जात आहे लस
पूनावालांची संपत्ती २०२१ मध्ये ७.५ अब्ज डॉलरने वाढून १९ अब्ज डॉलर झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी कोविशील्ड ही लस तयार करत आहे. भारताबरोबरच जगातील अनेक देशांना या लसीचा पुरवठा केला जात आहे. सीरम जगभरातील १६५ देशांना वैयक्तिक लस पुरवते.

लसीने बनवले अब्जाधीश
नऊ नवीन अब्जाधीशांची संपत्ती १९.३ अब्ज डॉलर्स आहे आणि इतक्या पैशातून गरीब देशांच्या संपूर्ण लोकसंख्येला एकापेक्षा जास्त वेळा कोविड लस दिली जाऊ शकते. नव्या अब्जाधीशांच्या यादीत अग्रस्थानी आहेत अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन बेन्सेल आणि त्यानंतर फायझर कंपनीसह लस बनवणाऱ्या बायो एन्टेकचे प्रमुख उगर साहिन यांचा क्रमांक लागतो. या व्यतिरिक्त, चिनी कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे तीन सह-संस्थापक देखील नवीन अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

जॉन्सन अँड जॉन्सनची जोरदार कमाई
औषध निर्माता कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे की, चालू कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांनी ५० कोटी डॉलरच्या कोविड-१९ लसी विकल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती लस
उत्तर प्रदेशात १२,२१,६०,३३५ लसीचे डोस देण्यात आले आहेत, तर महाराष्ट्रात ९,३२,२५,५०६ डोस दिले गेले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ६,८५,२८,९३६ डोस दिले गेले आहेत, तर गुजरातमध्ये ६,७६,८७,९१३ लसीचे डोस आहेत. देशातील ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: