पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; प्रचंड घबराट, काही क्षणांत दुकानं झाली बंद


हायलाइट्स:

  • पुण्यातील उरळीकांचन येथे भरदिवसा गोळीबार
  • एका वाळू व्यावसायिकासह दोन ठार, एक जखमी
  • पूर्ववैमनस्यातून झाला हल्ला; पोलीस तपास सुरू

म. टा. प्रतिनिधी । हडपसर

लोणी काळभोर हद्दीतील उरळीकांचन (Uruli Kanchan Firing) येथे पूर्व पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात एका वाळू व्यावसायिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबारचा थरार पाहून उरळीकांचन परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद केली. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

वाचा: गृहमंत्री राहिलेला माणूसच भ्रष्टाचारात अडकलेला असेल तर… अण्णा हजारे अखेर बोलले!

संतोष जगताप हे गोळीबारात मरण पावलेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करीत होते. त्याच वेळी रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला व गोळीबारही केला. यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला. जगताप यांनी जखमी अवस्थेतही हल्लेखोराना प्रत्युत्तर देत त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर इतर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

गोळीबारात जखमी झालेल्या जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

वाचा: …तर एक जीव हकनाक गेला नसता; महापौरांनी व्यक्त केली खंतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: