rahul gandhi hardik patel : हार्दिक पटेल नको…! राहुल गांधींसोबतच्या बैठकीत गुजरात काँग्रेस नेत्यांचा विरोधी सूर


नवी दिल्लीः दिल्लीत राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या नेत्यांसोबत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आणि नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत आज बैठक ( rahul gandhi meets party leaders from gujarat ) घेतली. बैठकीत हार्दिक पटेलना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेला अनेक बड्या नेत्यांनी तीव्र विरोध व्यक्त केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष बाब म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रभारी रघु शर्मा यांच्यासोबतीने सर्व नेत्यांशी एक-एक करून चर्चा करण्याबरोबरच सर्व नेत्यांसोबत वन-टू-वन बैठक घेतली. वन-टूवन बैठकीत राहुल गांधी यांनी सर्व नेत्यांचे मत घेतले.

हार्दिक पटेल यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेवर अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपला निषेध नोंदवला. हार्दिक पटेल यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले तर पक्षही सोडू शकतो, असा इशारा काही नेत्यांनी दिल्याचं बोललं जातंय.

हार्दिक पटेल हे वयाने खूप लहान आहेत. त्यांच्याकडे फारसा अनुभवही नाही आणि सर्वात जास्त म्हणजे हार्दिक अजूनही एका विशिष्ट जातीचा नेता म्हणून ओळखला जातो, म्हणजेच फक्त पटेल जे पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात. राज्याचे मुख्यमंत्री देखील पटेल आहेत. पटेल समाजाला निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांना निवडून देतील, असं पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं.

राहुल गांधींची गुजरात काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक

punjab congress : पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेसने आता प्रभारी हरीश रावत यांना हटव

गुजरात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध लक्षात घेता हार्दिक पटेल यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास फारसा वाव नाही. यामुळे आता इतर नावांवर विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्षनंतर काही जणांना उपाध्यक्षही बनवले जाऊ शकते, असं सूत्रांनी म्हटलंय.

sonia gandhi : भाजपला घेरणार! सोनिया गांधींच्या निवासस्थानी उद्या होणार काँग्रेसची सीईसीची बैठक

विशेष म्हणजे, राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत गुजरात काँग्रेसचे इतर सर्व नेते, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी देखील उपस्थित होते. मात्र, दुपारनंतर दोन्ही बैठकीतून निघून गेले. ते कन्हय्या कुमारसोबत प्रचारासाठी बिहारला रवाना झाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: