येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार
प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली – खासदार शरद पवार
जिरवाजिरवीचे राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तसेच विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रमण थांबवायचे आहे – धैर्यशील मोहिते पाटील
माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०४/२०२४- आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे खासदार शरद पवार यांची स्वाभिमानी सभा गर्दी आणि उत्साहात पार पडली.
या सभेत खासदार शरद पवार यांनी गेल्या दहा वर्षात आपल्याला विकास कामांपासून कसे रोखले प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली हे समजून सांगितले.
येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई आहे.आपण सर्वांनी आपली ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
मोदी सरकार यांनी आपल्याला १० वर्षात काय दिले – खा.शरद पवार
मोदी सरकार हे गेल्या दोन्ही निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारी मुद्यावर विजयी झाले.आज त्यांना सत्तेत येऊन १० वर्षे झाले. त्यांनी आपल्याला या दहा वर्षांत काय दिले तर जास्त बेरोजगारी आणि जास्त गरिबी दिली.त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकदीने उभे रहा.
माढा मतदारसंघातील छोट्या छोट्या प्रश्नावर काम करण्यासाठी माझी उमेदवारी- धैर्यशील मोहिते पाटील
माढा मतदारसंघात प्रलंबित कामे करण्यापेक्षा जिरवा जिरवीचे राजकारण चालू आहे. त्याला हद्दपार करण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रण आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून थांबवायचे आहे.
यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर, शिवाजी कांबळे,माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,संजय कोकाटे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव, संजय पाटील घाटणेकर, दादासाहेब साठे, शिवसेना नेते धनंजय डिकोळे, हरिदास रणदिवे,बाबाराजे देशमुख, शेखर माने,नागेश फाटे,मोडनिंचे सरपंच बाबुराव सुर्वे,भारत पाटील, आशाताई टोणपे, वर्षा क्षिरसागर,सुवर्णा शिवपुरे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------