मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे – खा.शरद पवार
माढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.24/04/2024 – मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे.मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याची असल्याचे मत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी खासदार शरद पवार बोलत होते. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे.क्षीरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे त्यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मतदारांना केले आहे.
शरद पवार यांनी ऐकवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी मोडनिंब येथेही पवार यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी खासदार शरद पवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ऐकवले आहे.पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत,अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानांवर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली आहे. नरेंद्र मोदी यांचे 2014 चे भाषण यावेळी त्यांनी ऐकले तर दिलेल्या आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही आणि शिव्या आम्हा लोकांना घालत आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले. आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडाच्या घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, अशी स्थिती मोदी साहेबांनी आज देशामध्ये केली आहे, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
यावेळी यावेळी माढ्याच्या शिवाजी कांबळे, माजी नगराध्यक्षा मिनलताई साठे, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील,संजय कोकाटे,संजय पाटील घाटणेकर, माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर, नलिनी चंदेले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, विजयसिंह मोहिते पाटील, बळीराम साठे,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील साईनाथ अभंगराव,शिवाजी कांबळे, दत्ताजी गवळी, दादासाहेब साठे,आनंद टोणपे,समीर मुलाणी, बाबूतात्या सुर्वे, सयाजी पाटील,आनंद कानडे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------