नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार – सरपंच ऋतुराज सावंत
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे,ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत,रवी सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत.अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे.नियमित कर्ज फेडीसाठी 50,000 रु प्रोत्साहनपर रक्कम, राज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध व कुटुंब रक्षण 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा मोफत देण्यात येणार आहे.महालक्ष्मी योजनेतून महिलांसाठी दरमहा 3000 रु, महिला व मुलींसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदार संघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही असे वाकाव चे सरपंच ऋतुराज सावंत यांनी सांगितले
यावेळी नगरसेवक प्रताप गंगेकर,नगरसेवक संतोष नेहतराव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेवक शंकर पवार, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब मुलाणी, नागेश फाटे, सुधीर भोसले,साधना राऊत,अमर सुर्यवंशी,शिंदे शिवसेना नेते मुन्ना भोसले,पैलवान औदुंबर शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.