पंढरपुरातील प्रलंबित प्रश्न सोडवा,नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदेंची मागणी

पंढरपुरातील बुध्दविहार, कोळी समाज व सफाई कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा, नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदेंची मागणी
   पंढरपूर - पंढरपूर शहरातील यमाई तलाव परिसरात अत्याधुनिक बुध्दविहार उभारण्यासाठी 5 कोटी रूपयांचा निधी मिळावा,सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या व पंढरपूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक लावण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यानंतर ना.प्राजक्त तनपुरे यांनी नगरविकास खात्यातून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करू व लवकरच मंत्रालयात बैठक बोलावून दोन्ही समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन दिले आहे.

पंढरपूर शहरामध्ये यमाई तलाव परिसरात अत्याधुनिक बुध्दविहार उभारले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 50 कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तरी नगरविकास खात्याकडून या बुध्दविहारासाठी 5 कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा. 

महाराष्ट्र आराध्य दैवत पांडुरंगाच्या सेवेत महादेव कोळी समाज हा पुर्वी सेवेकरी होता.गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्यास होत असलेली दिरंगाई यामुळे महादेव कोळी समाजा तील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. आदिवासी कार्यालयाला 50 वर्षापूर्वीचे पुरावे देवूनसुध्दा या समाजाला न्याय मिळू शकत नाही. निवडणूकीच्या काळात सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाला आश्वासन दिले होते. जर आम्ही सत्तेत आलो तर पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय देवू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असता त्याबाबत त्यांनी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून बैठक लावण्याचे सुचविले आहे. तरी आपण संबंधित आदिवासी महादेव कोळी समाजाचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची बैठक आपल्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात लवकरात लवकर घेवून सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत.

 पंढरपुरात गुजराथी समाज हा सफाई स्वच्छते चे काम स्वातंत्र्य काळापासून करीत आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. या समाजाने वर्षानुवर्षे शासन दरबारी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: