कोहलीनंतर पाकिस्तानी पत्रकाराचा या कर्णधाराला बेताल सवाल; खेळाडू परिषदेतून उठून गेला


नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्यांदा भारत नंतर न्यूझीलंड आणि शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाचा पराभव केला, पण हा विजय पाकिस्तानला पचवता आलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर एका पाकिस्तानी पत्रकाराने अफगाण कर्णधाराला देशातील सद्यस्थितीवर प्रश्न केला. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने या प्रश्नाकडे विनम्रपणे दुर्लक्ष केले, पण निर्लज्ज पाकिस्तानी पत्रकाराने त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

पाक पत्रकाराचा बेताल प्रश्न
पाकिस्तानी पत्रकाराने असे काही बेताल प्रश्न विचारले, ज्यावरून आज सगळीकडे टीका होत आहे. सामन्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने मोहम्मद नबी यांना प्रश्न विचारला की, ‘सरकार बदलले आहे, परिस्थिती बदलली आहे आणि तुम्ही परत जाल, तेव्हा तुम्हाला भीती वाटेल का? पाकिस्तानशी संबंध चांगले आहेत, हे संबंध चांगले राहिल्यास अफगाणिस्तान संघाला आणखी फायदा होईल का?

मोहम्मद नबीचं विनम्र उत्तर
मोहम्मद नबीने अतिशय नम्रपणे या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, ‘आपण ते प्रश्न सोडून फक्त क्रिकेटबद्दल बोलू शकतो का? जर आपण क्रिकेटबद्दल बोललो, तर ते चांगले होईल. आम्ही येथे विश्वचषक खेळण्यासाठी आलो आहोत आणि पूर्ण तयारीने आलो आहोत. तुम्हाला क्रिकेटशी संबंधित काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते विचारा.

वाचा- watch video : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा जवळ जवळ पराभव केला होता, पण…

पत्रकाराचा पुन्हा प्रश्न
पाकिस्तानी पत्रकार इथेच थांबला नाही. पाकिस्तानी पत्रकाराने पुन्हा विचारले की, ‘भविष्यात अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानशी चांगले संबंध असल्याने किती फायदा होईल? मोहम्मद नबीने पुन्हा हा क्रिकेटशी संबंधित प्रश्न नसल्याचे सांगितले. आणि पत्रकार परिषद आटोपून तो निघून गेले.

विराट कोहलीने पाक पत्रकाराला फटकारले
दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतरही पाक पत्रकाराने असाच प्रकार केला होता. पाकिस्तानी पत्रकाराने विराट कोहलीला विचारले की, ‘रोहित शर्माला संघातून वगळून ईशान शर्माला घेण्याचा विचार केला आहे का? ईशानने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळायला नको होते.’

वाचा- पराभवानंतर देखील भारतीय संघात बदल होणार नाहीत; न्यूझीलंडविरुद्ध हा असेल फॉर्म्युला

या प्रश्नानंतर विराट आश्चर्यचकित झाला होता. “हा एक अतिशय धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं सर? तुमच्या मते संघ कसा असायला हवा होता? माझ्या मते सर्वोत्तम असलेल्या संघासोबत मी गेलो. तुमचे मत काय आहे? तुम्ही रोहित शर्माला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वगळले असते का? गेल्या सामन्यात त्याने काय कामगिरी केली माहित आहे ना? मला सांगा? अविश्वसनीय. तुम्हाला जर वाद हवा असेल, तर आधी मला कळवा म्हणजे मी त्यानुसार तयारी करू शकेन,” असे बोलून विराटने त्या पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: