महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आ. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चूकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला. केवळ भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळं राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे.देशात महागाईने उच्चांक गाठला आहे,यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे.तर दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याचीही टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
प्रणिती शिंदे यांनी आज नांदणी, चिंचपुर, बरूर, हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, टाकळी, औज, कारकल, येळेगाव, विंचूर, शंकरनगर, निंबर्गी, मंद्रुप या गावांनी भेटी दिल्या. या दौऱ्यात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागील दहा वर्षात भाजपचे दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपला प्रत्येक वेळी उमेदवार बदलावा लागला. आता तर त्यांना थेट बाहेरील उमेदवार आयात करावा लागला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
भाजपच्या दोन्ही निष्क्रिय खासदारांमुळे सोलापुरच्या विकासाची १० वर्षे वाया गेली आहेत. भाजपने आजपर्यंत फक्त रेटून खोट बोलण्याचं काम केले. यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न ना मार्गी लावले ना यांनी कामगारांचे समस्या सोडवल्या. उलट यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
लोकशाही वाचवण्यासाठी ही शेवटची लढाई आहे.त्यामुळे भाजपचा भोंगळ कारभार आपल्याला उलथून टाकायचा आहे. यासाठी भाजपविषयी जो संताप आहे तो संताप भाजप विरोधात मतदान करून दाखवून द्या.तुमची ही सोलापूरची लेक तुमच्या विसकमासाठी कटीबध्द असून तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या ७ मे रोजी मतदान करण्याचे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, हरीष पाटील, सुरेश हसापुरे, पृथ्वीराज माने, बाळासाहेब शेळके,अमर पाटील,बाबा मिस्त्री,अशोक देवकते,शकील कुडले, गायकवाड सर यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------