चुकीला माफी नाही; देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • अनिल देशमुखांना ईडीकडून अटक
  • चौकशीनंतर ईडीने केली अटकेची कारवाई
  • चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया

पुणेः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED)अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. देशमुखांच्या अटकेनंतर भाजपनं महाविकास आघाडीवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी काही ईडीचा अधिकारी नाही. पण अधिकाऱ्यांनी देशमुखांना पुरेसा वेळ दिला, पुरावे गोळा करायलाही वेळ दिला आणि सूचनाही वारंवार दिली आहे. कोणत्याही कोणत्या मार्गाने अटक पूर्व जामिन मिळेल याचेही प्रयत्न झाले. अनिल देशमुख स्वतःहून हजर झालेत त्या अर्थी त्यांचे सगळे दरवाजे बंद झालेत,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘पंतप्रधान मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून भाजपचा कार्यकर्ता असो की काँग्रेसचा जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणारच. कोणाचीही चुक माफ केली जाणार नाही. मात्र, देशमुखांच्या अटकेमुळं राजकीय आणि सामाजिक जीवन हादरलं आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः अनिल देशमुख यांना अखेर अटक; १३ तासांच्या चौकशीनंतर…

दरम्यान, अ सोमवारी अनिल देशमुख यांना रात्री १२च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले होते. व ईडीच्य चौकशीसाठी सहकार्य करणार, असं म्हणाले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित होते. जवळपास १३ तास अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सेक्शन १९ पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जवळपास १३ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. अनिल देशमुख चौकशीस सहकार्य करत नसल्याचं ईडीचे म्हणणे आहे. आज मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे.

वाचाः अनिल देशमुखांना ईडीकडून अटक; नितेश राणेंच्या ‘या’ ट्वीटचा नेमका अर्थ काय?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: