आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयां साठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

आमदार सचिन पाटील यांची महानुभाव पंथीयांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथे दि 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्याकडे अमरावती येथील परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात श्रीपंचावतार उपहार विधी तसेच विडावसर व महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपाध्य कुळाचार्य श्री बिडकर बाबाजी,महंत श्री राहेरकर बाबाजी,महंत श्री कापूसतळणीकर बाबाजी तसेच फलटण येथील निवासी संत महंतांची उपस्थिती लाभली.या मंगलमय सोहळ्यासाठी फलटण – कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील उपस्थित होते.नूतन आमदार सचिन पाटील यांच्या सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी महानुभाव पंथीयांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. भक्तनिवास व मंदिर सुशोभीकरण करून फलटण ही महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून भारतभर नाही तर जगामध्ये ओळखली जाईल यासाठी प्रयत्न करु.

यावेळी त्यांच्यासमवेत फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनुप शहा, सचिन आहिवळे यांच्यासह मान्यवर व तसेच शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य महंत श्री श्यामसुंदर जामोदेकर व सेवा समर्पण गृप चे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार महंत श्री गोपाळव्यास बाबा व महंत श्री विरागव्यास बाबा यांनी मानले.

Leave a Reply

Back To Top