लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक – खडके पाटील मॅडम

लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक-खडके पाटील मॅडम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात श्रीकांत शिंदे यांच्यावतीने उपक्रम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-लांब पल्ल्यावरून येणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना सायकल वाटप करण्याचा श्रीकांत शिंदे यांचा हेतू अत्यंत दिशादर्शक आहे आणि हा उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी हाती घेतला पाहिजे याच खरोखर कौतुकास्पद आहे असे गौरवोद्‌गार पंढरपूर शहर पोलीस अधिकारी खडके पाटील मॅडम यांनी काढले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रम सप्ताह राबविण्यात आला.

यानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 5 हजार वह्या व ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नागेश भोसले,पंढरपूर शहर पोलीस अधिकारी खडके पाटील मॅडम,मोहम्मद उस्ताद, गणेश अधटराव,विशाल आर्वे,गणेश अंकुशराव, संग्राम अभंगराव,बालाजी बागल,वर्षा शिंदे, कांचन जाधव,यशवंत विद्यालयाचे गोंजारी सर,सुनिल जाधव,निलेश माने,संजय म्हमाने,लाला पानकर,अमोल परबतराव, रशीद मुलाणी, सचिन सोलंकी, सूरज पेंडाल,प्रदीप निर्मळ,सारंग महामुनी आदि उपस्थित होते.सदरचा उपक्रम यशवंत विद्यालय,आपटे हायस्कूलमधील विद्यार्थी यांना वही वाटप व पंढरपूर शहरातील विवेक वर्धीनी,आपटे हायस्कूल,द.ह.कवठेकर, मातोश्री विद्यालय या शाळेमधील मुलींना सायकल वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात श्रीकांत शिंदे म्हणाले की, डिजिटल बोर्ड,हार फुले यावर खर्च न करता गेली 15 वर्ष गरजू मुलींना सायकल वाटप व मुलांना वही वाटप करण्यात एक वेगळेच समाधान मिळते अन्‌ खऱ्या अर्थाने दादांच्या वाढदिवसाला प्रत्येक मुलींच्या शुभेच्छा मिळतात हाच खरा आनंद मिळतो आणि इथून पुढे ही हा उपक्रम सुरू असेल असे आश्वासन दिले.

नागेश भोसले म्हणाले की,अजितदादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने असो किंवा इतर कार्यक्रमानिमित्ताने श्रीकांत शिंदे हे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात.ते राबवत असलेल्या उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे त्यांनी असेच उपक्रम राबवावेत अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी मोहम्मद उस्ताद यांनी ही मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली कुंभार,अभिनव शिंदे ,सूरज अभंगराव,सूरज राठी,अल्ताब मुंडे,ओम गुंड,ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील कोरे यांनी केले.

Leave a Reply

Back To Top