मनसेचा सामाजिक उपक्रम- पूरग्रस्त शिवनीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
शिक्षणातून उजळणार भविष्य : दिलीप धोत्रे आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ नोव्हेंबर २०२५- सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शिवनी गावात आज हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती.

याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे,प्रदेश सरचिटणीस तथा वॉटर मॅन डॉ.मनोज चव्हाण,जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख तसेच मल्लू पाटील,गोविंद बंदपट्टे आणि श्री.गजभर सर उपस्थित होते.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले की, पूरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले पण मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये हेच आमचे ध्येय आहे.शालेय साहित्य ही फक्त पुस्तके आणि वही नाहीत तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी आहेत.

मनसेच्या या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गाने समाधान व्यक्त केले.राजकारणाबरोबर समाजकारणही तितकेच महत्त्वाचे आहे हे मनसेच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


