ब्राम्हण महासंघाचा भाजपा महायुतीचे समाधान आवताडे यांना पाठिंबा
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/ २०२४ :- आज ब्राम्हण महासंघ पंढरपूर यांच्या सदस्य व सभासदांची बैठक सौ प्रणिती दामोदरे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी ब्राम्हण ज्ञाती बांधव उपस्थित होते.

ब्राह्मण संघटन,युवक संघटन बांधणी, आगामी पंढरपूर प्राधिकरण साधक -बाधक परिणाम,सहल नियोजन आणि उमेद अंतर्गत तरुणांचे संघटन यावर चर्चा कृती आढावा घेण्यात आला.युवक संघटन 80 टक्के कार्य पूर्णत्वास गेले असून लवकरच युवक महोत्सव कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष चैतन्य केसकर यांनी दिली.

यावेळी मतदार संघातील विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरले.आगामी काळात संघटनेत तरुणांची संख्या विस्तार व उद्योगाबाबत ध्येयधोरणे याबाबत जिल्हा संघटक अमोल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
सहली व व्यवस्थापन अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली. तालुका उपाध्यक्ष चळे येथील पिंटू कुलकर्णी, सचिवपदी मनोज राजगुरू तर संपर्कप्रमुखपदी ओंकार कुलकर्णी त.शेटफळ यांची नियुक्ती करण्यात आली.

आभार जिल्हा महिला संघटक अमृता बडवे यांनी मानले. यावेळी जेष्ठ अशोक कुलकर्णी प्रदीप कुलकर्णी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.