आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणे गरजेचे – आमदार समाधान आवताडे

भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वात भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न झाली.

सोलापूर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अनेक विकासकामे झाली असल्याची माहिती देत आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे केले.

सोलापूरच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने एकलासपूर येथील ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading