बीआरएस चे विविध पदाधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची विकासकामे पाहून केला पाठिंबा जाहीर

बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले

फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024 – माळशिरस, नातेपुते,सदाशिवनगर पंचक्रोशीतील बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक येत्या ७ मे रोजी होत आहे. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक
निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी नातेपुते,माळशिरस  सदाशिवनगर पंचक्रोशीतील भाजपच्या निष्ठावतांनी सुरूवातीपासून विजयासाठी कंबर कसली आहे तर आता बीआरएस चे विविध पदाधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकासकामे पाहून देशात भाजपचेच सरकार येणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत असे सांगून बीआरएस चे तालुकाध्यक्ष अशोक भोसले व ओबीसी सेलचे अध्यक्ष शंकर बनकर यांनी आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला.

याबद्दल त्यांचे स्वागत फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा,नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे ,फलटण शहर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.अनिल श्रीवास्तव यांनी करून बीआरएस ने भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *