देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजीत पाटील उपमुख्यमंत्री पवारांच्या भेटीला

देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजीत पाटील उपमुख्यमंत्रीच्या भेटीला Abhijeet Patil, who is setting up first oxygen project in country, called on Deputy Chief Minister

पंढरपूर ,नागेश आदापूरे – कोरोनाच्या संकट काळात कोरोना रूग्णांना लागणारा आँक्सिजन पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे रुग्णांना तात्काळ आवश्यक आँक्सिजन कमी असल्याने रुग्णांना आपले जीव धोक्यात पडत आहे त्यामुळे धाराशिव साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले होते.

या धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्रकल्प व्हर्च्युअल उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना भेेटण्यासाठी सांगितले असता नियोजित वेळेत मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात अभिजीत पाटील यांनी भेट घेतली. 

   यावेळी धाराशिव साखर कारखान्यावरील ऑक्सिजन प्रकल्पाची संपुर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन राज्यातील इतर कारखान्यातही ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या ऑक्सिजनच्या मागणीनुसार साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती पुर्ण कशी होऊ शकेल यावर सविस्तर चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांच्याशी केली.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: