नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा जिल्हा सदस्यपदी निवड

नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा जिल्हा सदस्यपदी निवड

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष व पंढरपूर येथील विधिसेवा स्वयंसेवक नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा या जिल्हा पदावर अध्यक्ष जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांचे आदेशाने जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

नंदकुमार देशपांडे हे अनेक वर्षांपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच विधी स्वयंसेवक म्हणूनही पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील विधी सेवा समितीवर कार्यरत आहेत. ही समिती जिल्ह्यातील मुलांसाठी कायदेशीर सेवा युनिट या माध्यमातून कार्यरत आहे.

नंदकुमार देशपांडे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मुलांसाठी कायदेशीर सेवा युनिट या जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Back To Top