टीम इंडियामध्ये दोन गट – एक कोहलीसोबत दुसरा त्याच्याविरोधात; शोएब अख्तरचा दावा


इस्लामाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मोठे पराभव स्वीकारावे लागल्याने चोहोबाजूंनी टीका होत आहे. संघाची ही कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. अख्तरने टीम इंडियाच्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. टीम इंडियामध्ये दोन गट पडल्याचेही त्याने म्हटले आहे.

वाचा-विराट आणि रोहितला बसला आणखी एक झटका; पाहा पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केले

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “भारतीय संघात दोन गट आहेत, असे मला वाटते. त्यातील एक गट विराट कोहलीविरुद्ध, तर दुसरा विराटसोबत आहे. ते स्पष्टपणे दिसत आहे. संघ विभागलेला दिसतो. हे का होत आहे, हे मला माहीत नाही. कारण कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे. त्याने घेतलेला हा निर्णय चुकीचा असू शकतो, पण तो एक महान क्रिकेटर आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.

वाचा- हार्दिक, भुवीला डच्चू; विराटबाबत BCCI दोन दिवसा घेणार मोठा निर्णय

या गोष्टीबाबत नाराजी
अख्तरने न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला की, “भारतीय संघावर टीका करणे आवश्यक आहे, कारण ते न्यूझीलंडविरुद्ध खराब क्रिकेट खेळले आणि त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होता. नाणेफेक हरल्यानंतर सर्वांचाच हिरमोड झाला होता, असं का होतंय याची त्याला कल्पना नव्हती. भारताने नाणेफेक गमावली होती, संपूर्ण सामना नाही. त्या दिवशी भारताकडे गेमप्लॅन नव्हता.”

वाचा- रोहितला ओपनिंगमधून हटविल्याने सेहवाग संतापला; २००७च्या विश्वचषकातील पराभवाचं सांगितलं

भारतासाठी उपांत्य फेरीच्या वाटा खडतर
पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत जाणे कठीण झाले आहे. यासाठी त्यांना आता आपले तिन्ही सामने जिंकावे लागतील, तसेच इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पहिल्या सामन्यानंतरही संघनिवडीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणखी निशाण्यावर आले. न्यूझीलंडविरुद्ध संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला सलामीसाठी पाठवले नाही. त्याच्या जागी ईशान किशन आणि के.एल. राहुलला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवण्यात आले. रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रोहितला फलंदाजीसाठी उतरवण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. अनेक माजी क्रिकेटपटूंनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: