डिझेलवर चोरट्यांची वक्रदृष्टी! माचणूर येथे उभ्या ट्रकची टाकी फोडून 150 लिटर इंधन चोरले

माचणूर हद्दीत ट्रकमधील 150 लिटर डिझेलची चोरी; 14 हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास

डिझेलवर चोरट्यांची वक्रदृष्टी! माचणूर येथे उभ्या ट्रकची टाकी फोडून 150 लिटर इंधन चोरले

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील माचणूर हद्दीत उभा केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी 150 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे 14 हजार 934 रुपयांचे डिझेल लंपास करण्यात आले असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक नितीन रंदवे रा.ब्रम्हपुरी हे सोलापूरहून सिमेंट घेऊन 30 मे रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे निघाले होते.प्रवासा दरम्यान त्यांनी माचणूर परिसरात ट्रक उभा केला.सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या दोन मुलांना ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपविले होते.

याच दरम्यान अज्ञात चोरटे चारचाकी वाहनातून तेथे आले. त्यांनी ट्रकच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून सुमारे 150 लिटर डिझेल चोरी करून पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधनाच्या किमती वाढत असताना डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मोहोळ परिसरातही वाहनातून पाईपच्या सहाय्याने डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी पकडल्याची घटना घडली होती.

या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस या घटनेचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित वाहनांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Back To Top