ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे उघडणारे फॅबटेक; पालकमंत्र्यांनी गौरविले भाऊसाहेब रुपनर यांचे कार्य

फॅबटेकच्या शैक्षणिक क्रांतीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे उघडणारे फॅबटेक; पालकमंत्र्यांनी गौरविले भाऊसाहेब रुपनर यांचे कार्य

भाऊसाहेब रुपनर यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक; फॅबटेकच्या शैक्षणिक क्रांतीचा गौरव

सांगोला | ज्ञानप्रवाह न्यूज : दि.30 मे रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फॅबटेक शिक्षण संकुलात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेच्या कार्याची पाहणी केली.यावेळी फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक भाऊसाहेब रुपनर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी केलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,उद्योजक बाळासाहेब एरंडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती चेतनसिंह केदार सावंत,टेक्स्टाईल उद्योग समूहाचे चेअरमन राजाभाऊ रुपनर,संस्थेचे सचिव डॉ.अमित रुपनर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारंभात बोलताना संस्थापक भाऊसाहेब रुपनर यांनी फॅबटेकच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत ग्रामीण भागात घडवून आणलेल्या शैक्षणिक परिवर्तनाची माहिती दिली. पूर्वी उच्च शिक्षणासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. आर्थिक अडचणी आणि विविध सामाजिक मर्यादांमुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फॅबटेक संस्थेची स्थापना करण्यात आली.

आज फॅबटेकच्या माध्यमातून पब्लिक स्कूल, ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा अभियांत्रिकी, पदवी अभियांत्रिकी तसेच फार्मसी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आशेचा किरण ठरत आहे.

संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेचा (NAAC) ‘A’ ग्रेड मिळवला असून स्वायत्त संस्थेचा दर्जाही प्राप्त केला आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थेसाठी ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे मत भाऊसाहेब रुपनर यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फॅबटेकच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. भाऊसाहेब रुपनर यांच्या नेतृत्वाखाली फॅबटेकने शिक्षण क्षेत्रात उभारलेला आदर्श राज्यातील इतर संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरणारा आहे.

Leave a Reply

Back To Top