आज अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव झाला…; शोएब अख्तर म्हणायचे तरी काय


नवी दिल्ली: न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आज एक महत्वाची लढत होणार आहे. या दोन्ही देशांपेक्षा भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांची या सामन्यावर अधिक नजर असणार आहे. भारताला जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर अफगाणिस्तानला न्यूझीलंडचा पराभव करावा लागले. या सामन्यावर सर्वांची नजर असताना पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएभ अख्तरने असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे जणू या लढतीचा निकाल फिक्स झालाय.

शोएब अख्तरने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या लढती आधी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, जर न्यूझीलंडचा या सामन्यात पराभव झाला तर अनेक प्रश्न उपस्थित होतील. मी तुम्हाला फक्त अलर्ट करत आहे. मला भिती वाटते ते की टॉप ट्रेडिंगमध्ये एक आणखी गोष्ट सुरू होईल. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. पण पाकिस्तानच्या लोकांमध्ये न्यूझीलंडसाठी खुप भावना आहेत. आज तसा काही विजयी अफगाणिस्तानने नोंदवला तर लोक त्याला योग्य समजणार नाहीत. सोशल मीडियावर त्याचा राग आवरता येणार नाही.

आजच्या लढतीत जर न्यूझीलंडने विजय मिळवाल तर भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोण्याच्या आशा संपुष्टात येतील. कारण या विजयासह न्यूझीलंडचे ८ गुण होतील आणि भारताने उद्या होणारी अखेरची लढत जिंकली तरी त्याचे ६ गुण होतील. या उटल जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारताच्या आशा कायम राहतील आणि त्यांना अखेरच्या लढतीत मोठा विजय मिळवावा लागले. न्यूझीलंडचा विजय झाल्या उद्या भारताची नामिबिया विरुद्ध होणारी लढत ही फक्त औपचारिकता असेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीची ही नेतृत्व करत असतानाची अखेरची मॅच असेल. कर्णधार म्हणून विराट उद्या अखेरची मॅच खेळतो की त्याला आणखी दोन सामन्यात देशाचे टी-२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते याचा निकाल आज रात्री होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: