pm modi tops in global leader approval : PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, मिळाली ७० टक्के पसंती


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये ७० टक्के पसंतीसह पीएम मोदी अव्वल स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदींना जगभरातील प्रौढांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने २०१९ मध्ये डेटा गोळा करण्यास सुरवात केली होती.

मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे ६६ टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी ५८ टक्के, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ५४ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन ४७ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

BJP’s National Executive Committee : भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू; PM मोदी,

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन ४४ टक्के पसंतीसह सहाव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे जस्टिन ट्रुडो ४३ टक्क्यांसह सातव्या, तर युनायटेड किंगडमचे बोरिस जॉन्सन ४० टक्क्यांसह १०व्या क्रमांकावर आहेत.

Asaduddin Owaisi: ‘नमाज बंद करवून त्याजागी पूजा करणं, हा मुस्लिमांप्रती द्वेष’

‘मॉर्निंग कन्सल्ट’ ही पॉलिटिकल इन्टेलिजन्स रेटिंग कंपनी आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेमधील सरकारी नेत्यांसाठी रेटिंग ट्रॅक करते. साप्ताहिक आधारावर ही कंपनी १३ देशांसाठी डेटा अपडेट करते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: