धिरज डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

धिरज डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या मान्यतेने विठ्ठलवाडी,विसावा ता.पंढरपूर येथील धिरज दत्तात्रय डांगे यांची सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करत निवडीबद्दल आपले अभिनंदन अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड.गणेश पांडुरंग पाटील यांनी धिरज दत्तात्रय डांगे यांना दिले आहे.

यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुधीर भोसले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी , लतीफ मुलाणी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top