लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे शेवटी कोणाला कोणता मुक प्राणी आठवतो हा ज्याचा त्याचा प्रश्न-उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे

उद्या हडपसर मध्ये महिला शिवसेना मेळावा

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.02/05/2024- पुणे जिल्ह्यातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमे मुरलीधर मोहोळ,सुनेत्रा पवार,शिवाजीराव आढळराव पाटील,श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ दि.३ मे २०२४ रोजी हडपसरमधील हांडेवाडी रोड येथील हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान येथे सायं ६वा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिलांचे विविध प्रश्न मध्यवर्ती मेळाव्यात आणणे व महिलांचा राजकीय व सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन असणार आहे. स्नेह मेळाव्यास शिवसेना नेत्या, विधान परिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे तसेच जिल्ह्यातील सर्व महिला संपर्कप्रमुख, जिल्हा संघटिका व शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शिवसेना भवन पुणे येथील पत्रकार परिषदेत डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी दिली.

घरोघरी जाऊन प्रचार करत असताना कोणती काळजी घ्यावी, प्रसार माध्यम आणि सोशल मीडियावर पोस्ट करतांना काय सतर्कता आपण जपायला हवी या बद्दलचे मुद्दे आणि महिलांचे अनुभव एकमेकाला सांगता यावे. तसेच महिलांचे एक मतदार म्हणून तसेच नागरिक म्हणून अथवा एक स्त्री या दृष्टीने अनेक प्रश्न असतात यात आरोग्य,पाणी,स्वच्छता, सुरक्षा यामुळे स्त्रियांचा सामाजिक आणि राजकीय सहभाग वाढविणे शिवसेना महिला आघाडी काम करत आहे त्याची माहिती सर्वांना व्हावी या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मावरून आरक्षण संदर्भात स्पष्टीकरण करताना डॉ.निलम गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता धर्मावरून मिळणाऱ्या आरक्षण संदर्भात भाष्य केले होते.जर धर्म पाहून आरक्षण मिळाले तर अनेक जण धर्म परिवर्तन करून आरक्षणाची मागणी करतील. याचा अर्थ आपणच त्यांना धर्मांतर करण्याला प्रलोभन देतोय असा होईल.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, जेव्हा राजकीय परिवर्तन झालं एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना घेऊन बाहेर पडले तेव्हापासूनच त्यांची टीका चालू आहे.लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे शेवटी कोणाला कोणता मुक प्राणी आठवतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *